
मुंबई, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘‘परदेशात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक भारतीयाला शक्य ती मदत पुरविण्याच्या’’ धोरणानुसार, केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने ओमानमध्ये अडकलेल्या आणि अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या ३६ भारतीय कामगारांची सुटका झाली आहे. हे कामगार सुरक्षितपणे भारतात परत आले आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासानेही या कामगारांना तत्परपणे मदत केली.