ओमिक्रॉन : ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण; या देशांमध्ये सर्वाधिक कोरोना

Omicron variant
Omicron variantOmicron variant

लंडनमध्ये ओमिक्रॉन (Omicron variant) प्रकाराची आणखी दोन प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यामुळे यूकेमध्ये (UK) या प्रकरणांची एकूण संख्या ११ झाली (Most patients in Britain) आहे. ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच फ्रान्सच्या मंत्र्याने देशातील बिघडत चाललेल्या साथीच्या परिस्थितीबद्दल इशारा देखील दिला आहे. जगभरात कोरोनाचे २६ कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर ५२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (यूकेएचएसए) सांगितले, लंडनमध्ये दोन प्रकरणे दक्षिण आफ्रिकेतील प्रवासाशी संबंधित आहेत. सोमवारी स्कॉटलंडमध्ये सहा प्रकरणे आढळून आली. ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी सोमवारी पुष्टी केली की, त्यांनी बूस्टरवरील लस आणि लसीकरणाच्या संयुक्त समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत. ज्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांसाठी बूस्टर जैब्सचा समावेश आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये ४२,५८३ नवीन कोविड संसर्गाची नोंद झाली आहे. ज्यामुळे देशातील एकूण कोरोनाव्हायरस प्रकरणांची संख्या १०,१४६,९१५ झाली आहे.

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये जास्त थकवा, सौम्य स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला यांचा समावेश होतो. तर काही प्रकरणांमध्ये फक्त सौम्य उच्च ताप दिसून येतो. काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती न होता पूर्ण बरे होऊ शकतात. त्यांनी सांगितले की रुग्णाची लक्षणे डेल्टा प्रकारापेक्षा खूप वेगळी आहेत.

४० किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांवर जास्त परिणाम

कोरोनाचा नवीन प्रकार ४० किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांवर जास्त परिणाम करीत आहे. ज्यांना ओमिक्रॉन (Omicron variant) झाला त्यापैकी निम्म्या लोकांचे लसीकरण झालेले नाही. अशा लोकांना एक ते दोन दिवस तीव्र थकवा जाणवतो. यासोबतच डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होत आहे, असे कोएत्झी म्हणतात. जागतिक कोरोना बाधितांची संख्या २६२.७३ दशलक्षांवर गेली आहे, तर मृत्यूचा आकडा ५.२१ दशलक्षाच्या पार गेला आहे. तसेच लसीकरण ७.९९ अब्ज झालेले आहे, असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे म्हणणे आहे.

भारत दुसऱ्या क्रमांकाचा बाधित देश

यूएस हा जगातील सर्वाधिक बाधित देश आहे. यूएसमध्ये 48,554,890 कोरोनाबाधित (Corona patient) आढळले असून 7,80,140 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात 34,587,822 कोरोनाबाधित असून 4,68,980 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 22,094,459 बाधित आढळले असून 6,14,681 लोकांचा मृत्यू झाला आहे, ही माहिती सीएसएसईने दिली आहे.

५ दशलक्षाहून अधिक बाधित असलेले देश

  • यूके 10,285,745

  • रशिया 9,468,640

  • तुर्की 8,797,558

  • फ्रान्स 7,778,575

  • इराण 6,117,445

  • जर्मनी 5,881,432

  • अर्जेंटिना 5,881,432

  • स्पेन 5,164,184

  • कोलंबिया 5,069,64

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com