
Ukraine Russia War : तीन लाख युक्रेनियन लोकांनी सोडला देश
रशिया युक्रेन युद्धाने साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. अजूनही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णतः कोसळून गेला. यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले असून एकूण ३.२ दशलक्ष लोकांनी आधीच देश सोडला आहे.
यू.एन. स्थलांतर एजन्सीच्या अंदाजानुसार रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत तर ३.२ दशलक्ष आधीच देश सोडून पळून गेले आहेत. या युद्धामुळे युक्रेनचे जनजीवन पुर्णपणे विस्कटले असून मोठ्या प्रमाणावर तेथील जीवितहानी झाली.
हेही वाचा: 'युद्धामुळे पाश्चिमात्य कंपन्यांचा रशियाला रामराम, भारतीय फार्मा कंपन्या घेणार जागा'
युद्धग्रस्त युक्रेनमधील नागरिकांच्या स्थितीबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये चिंता व्यक्त केली. युक्रेनमधून आतापार्यंत २२ हजारांहून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणल्याचेही भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी सांगितले.
अमेरिका, ब्रिटनसह सहा देशांच्या विनंतीवरुन आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये युक्रेनमधील नागरिकांच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये तिरूमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. ‘युक्रेनमध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून मदत पुरविली जात असताना ती मानवता, समभाव आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारलेली असावी, त्यात राजकारण असू नये. या देशातील नागरिकांची सध्याची स्थिती अत्यंत बिकट असून जगाने त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच, युक्रेनवर युद्धाचे ढग जमा होण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २२ हजार ५०० भारतीयांना मायदेशी आणले असून १८ देशांमधील नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्यात भारताने मदत केली आहे, अशी माहितीही तिरूमूर्ती यांनी सुरक्षा समितीमध्ये दिली.
Web Title: On Russia Ukraine Crisis 32 Million People Left Ukraine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..