हा जगातील एकमेव खंड कोरोनाच्या विळख्यापासून आहे दूर

पीटीआय
Monday, 14 September 2020

कोरोना विषाणूपासून अंटार्क्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात.

जोहान्सबर्ग - कोरोना विषाणूपासून अंटार्क्टिका अद्याप मुक्त आहे. येथे या आजाराचा शिरकाव न झाल्याने जनजीवन नेहमीसारखे सुरळीत आहे. कोणत्याही निर्बंधांविना लोक बिनधास्त फिरू शकतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या जगातील अंटार्क्टिका हा एकमेव खंड कोरोनाच्या विळख्यापासून दूर आहे. येथे सध्या एक हजार शास्त्रज्ञांचे संशोधनासाठी वास्तव्य आहे. येथे येणाऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव या प्रदेशात होऊ नये, यासाठीही प्रयत्न करीत आहेत. अंटार्क्टिका द्विपकल्पापासून लांब असलेल्या ब्रिटनच्या रोथेरा संशोधन तळावरील संशोधन प्रमुख रॉब टेलर यांनी ते तेथे सुरक्षित वातावरणात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘कोरोनापूर्व काळात जेव्हा उर्वरित जगातील जीवनमान मनोहारी होते अंटार्क्टिकामधील संशोधक दीर्घकाळ एकांतवास, स्वावलंबन आणि मानसिक ताण सहन करीत होते. कोरोनामुळे अन्य देशांतही असाच अनुभव नागरिकांना अनुभवावा लागत आहे.’’

कोरोना संसर्गाचा फैलाव लक्षणे नसलेल्या मुलांपासूनही शक्य; अमेरिकी शास्त्रज्ञांचा दावा

दूर ठेवण्यासाठी...
‘कौन्सिल ऑफ मॅनेजर्स ऑफ नॅशनल अंटार्टिक प्रोग्रॅम’साठी ३० देश एकत्र
हवाई व जल वाहतुकीद्वारे अंटार्क्टिकासाठी प्रवेश केला जात असल्याने तेथे विषाणूंच्या प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना
पर्यटकांशी संपर्क, जहाज नांगरण्यास मनाई

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only continent in the world is far from the corona