esakal | ठणठणीत असलेल्या राणी एलिझाबेथच्या अंत्यसंस्काराची तयारी? रिपोर्ट लीक झाल्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

queen Elizabeth ii

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार कसे होतील? ब्रिटनमध्ये काय होईल याबाबतचा एक गुप्त रिपोर्ट लीक झाल्यानं खळबळ उडाली आहे.

ठणठणीत असलेल्या राणी एलिझाबेथच्या अंत्यसंस्काराची तयारी? रिपोर्ट लीक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वय सध्या ९५ वर्षे आहे. प्रिन्स फिलिप यांच्या निधनानंतर राणी एलिझाबेथ मोजक्याच कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिल्या आहेत. जी ७ शिखर परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आता राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार कसे होतील? ब्रिटनमध्ये काय होईल याबाबतचा एक गुप्त रिपोर्ट लीक झाल्यानं खळबळ उडाली आहे. ऑपरेशन लंडन ब्रिज रिपोर्टमध्ये राणीच्या निधनानंतर ब्रिटनममध्ये त्यांचे अंत्यसंस्कार, त्यासाठीचा पोलिस बंदोबस्त यांसह सविस्तर अशा नियोजनाची माहिती आहे. अहवाल लीक झाल्यानं ब्रिटन सरकारवर टीका होत असली तरी बकिंघहम पॅलेसकडून मात्र अद्याप यावर काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये परिस्थिती कशी असेल? तेव्हा होणाऱ्या संभाव्य गर्दीचे नियोजन आणि अंत्यसंस्कार कशा पद्धतीने होतील याचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला ऑपरेशन लंडन ब्रिज असं कोड नेम देण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. याची माहिती अमेरिकन वृत्तसंस्था पॉलिटिकोने प्रसिद्ध केली आहे. यात म्हटलं आहे की, राणीचे ज्या दिवशी निधन होईल तो दिवस D-Day म्हणून पाळला जाईल. तसंच राणीच्या निधनानंतर १० दिवसांनी दफनविधी होईल. तसंच अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करण्याआधी मुलगा प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचा दौरा करतील असेही अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा: 'आम्ही हार मानणार नाही', पंजशीर खोऱ्यातून अहमद मसूदची गर्जना

राणीच्या निधनानंतर दफनविधीपर्यंत काय होईल याचे नियोजन या लीक झालेल्या अहवालामध्ये आहेत. त्यानुसार, राणीची शवपेटी तीन दिवसांसाठी संसदेत ठेवण्यात येईल. तसंच राणीच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणावर लोक लंडनमध्ये गर्दी करतील. तेव्हा तिथे येणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठीची तयारी, सुरक्षा आणि गर्दीमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचेही नियोजन यामध्ये आहे.

लंडनमध्ये राणीच्या निधनानंतर काय परिस्थिती उद्भवू शकते याबाबतही रिपोर्टमध्ये अंदाज व्यक्त केला आहे. राणीचे निधन झाल्यानंतर नविन राजा चार्ल्स हा ब्रिटनच्या चार राष्ट्रांमध्ये दौरा करेल. तसंच राणीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल. विशेष म्हणजे याबाबत ब्रिटिश पंतप्रधानांसोबत एक करार झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

loading image
go to top