Cow : गायींना ठार मारण्याचा आदेश जारी; हेलिकॉप्टरमधून झाडणार गोळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mexico Cow

गिला जंगलातील भटक्या गायी कोणत्याही कारणास्तव जंगलात प्रवेश करणार्‍या प्रत्येकासाठी धोकादायक असतात.

Cow : गायींना ठार मारण्याचा आदेश जारी; हेलिकॉप्टरमधून झाडणार गोळ्या

न्यू मेक्सिको : अमेरिकेतील मेक्सिको (America Mexico) शहरात भटक्या गायींना (Cow) ठार मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या भटक्या गायींमुळं शेतीचं नुकसान होत असून पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण होत असल्याचं अमेरिकेच्या वन विभागाचं म्हणणं आहे.

वास्तविक, गायींना मारण्यासाठी हेलिकॉप्टर शूटर्स (Helicopter Shooter) भाड्याने घेतले आहेत. गायींना ठार मारण्याचं काम गुरुवारपासून सुरू होणार असून, ते चार दिवस चालणार आहे. यामध्ये सुमारे 150 गायींना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या भटक्या गायी डोंगर-दऱ्यांमधील नामशेष होत चाललेल्या प्रजातींची परिसंस्था नष्ट करत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टरमधून शूट करण्याच्या आदेशामुळं वाद निर्माण होऊ शकतो. काही कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एखाद्या प्राण्यावर हवेतून गोळ्या झाडणं हा एक क्रूर मार्ग आहे. त्याच वेळी, वन पर्यवेक्षक कॅमिल हॉवेस (Camille Hawes) यांनी सांगितलं की, 'इतर वन्यजीव आणि लोकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना मारणं आवश्यक आहे. परंतु, त्यांना संपवण्याचा मार्ग चुकीचा आहे.'

गिला जंगलातील भटक्या गायी कोणत्याही कारणास्तव जंगलात प्रवेश करणार्‍या प्रत्येकासाठी धोकादायक असतात. या भटक्या गायी लोकांवर हल्ले करतात आणि त्यांना नद्या, झुडूप आणि ओढ्यांमध्ये पळवून लावतात, असं हॉवेस यांनी एका निवेदनात म्हटलंय. दरम्यान, अमेरिकन वेस्टमध्ये जंगली डुकरांना हवेतून गोळ्या मारणं सामान्य आहे. मात्र, अशा प्रकारे गायींना मारण्यावरून वाद होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

टॅग्स :americaCow