
Nepal Violence
sakal
काठमांडू : नेपाळमध्ये सरकारविरोधी आंदोलन सुरू झाल्यापासून दोन डझनांहून अधिक तुरुंगांमधून १५ हजारांपेक्षा जास्त कैद्यांनी पलायन केले आहे. गुरुवारी एका तुरुंगात प्रशासन आणि कैद्यांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये तीन कैद्यांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आतापर्यंत तुरुंग प्रशासनासोबत झालेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.