‘ती’ दिवसातून पाच ग्लास पिते स्वतःची लघवी; म्हणे, वाइनसारखी येते चव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Drinks Own Urine

‘ती’ दिवसातून पाच ग्लास पिते स्वतःची लघवी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमेरिका : भारतात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायची लघवी नागरिक पितात. रोज सकाळी लघवी पिल्याने आरोग्य चांगले राहते, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, कोणी स्वतःची लघवी पीत नाही. परंतु, अमेरिकेतील महिला मागील चार वर्षांपासून स्वतःची लघवी पीत आहे. ती दिवसातून किमान पाच ग्लास लघवी पिते. तिला लघवीची चव वाइन (शॅम्पेन) सारखी वाटते. कॅरी असे त्या महिलेचे नाव आहे.

‘द सन यूके’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कोलोरॅडो येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय कॅरी यांना पाण्यापेक्षा लघवी प्यायला आवडते. त्या दिवसातून कमीत कमी पाच ग्लास लघवी पितात. म्हणजे त्यांनी चार वर्षांत सुमारे ३,४०६ लीटर लघवी पिली आहे. कॅरी यांनी सांगितले की, त्यांना लघवी पिण्याचे व्यसन आहे. लघवीची चव वाइन (शॅम्पेन) सारखी असल्याचा कॅरी यांचा दावा आहे.

हेही वाचा: जिला मुलगी म्हटले तिलाच केले गर्भवती; शेजाऱ्याचे कृत्य आले समोर

मला गरम लघवी प्यायला खूप आवडते. लघवी पिल्याने आनंद मिळतो. मी काय खाते यावर माझ्या लघवीचा वास अवलंबून आहे. आज त्याची चव चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. कधीकधी ते खारट असते, तर कधी शॅम्पेनसारखी चव असते, असे कॅरी यांचे म्हणणे आहे. कॅरी यांची मुलगी असे करण्यास मनाई करते. तिने आईला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी कॅरी यांच्यावर उपचार केले. परंतु, कॅरी यांनी लघवी पिणे काही सोडले नाही. लघवी पिणे सोडले तर मरून जाईल, असे कॅरी यांचे म्हणणे आहे.

कॅन्सरमुळे घेतला हा निर्णय

कॅरी यांना चार वर्षांपूर्वी मेलेनोमा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्वतःची लघवी पिली होती. तेव्हापासून त्यांना लघवी पिण्याची सवय लागली. त्यांनी केमोथेरपीऐवजी लघवीद्वारे उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: भारतामुळे अमेरिकेवर ताशेरे; नाव समाविष्ट न केल्याने वादंग

या कामांसाठीही लघवीचा वापर

कॅरी या फक्त लघवी पिण्यासाठीच वापरत नाही तर केसांनाही लावते. फेस पॅक म्हणून ती डोळ्याखाली लघवी लावत असते. टूथपेस्टसाठीही लघवीचा वापर करते. स्वतःच्या लघवीमुळे दातांना पांढरेपणा आणि ताकद मिळते असा दावाही कॅरी यांनी केला आहे.

loading image
go to top