
‘ऑक्सफॉम’चा निष्कर्ष; कोरोनामुळे दर ३० तासांत एका अब्जाधीशाची भर
दावोस (स्वित्झर्लंड) : कोरोनाच्या महासाथीने दर ३० तासांत एक नवीन अब्जाधीश निर्माण केला आहे आणि आता दहा लाख लोक त्यात गतीने दारिद्र्यात लोटले जाऊ शकतात, असे प्रतिपादन ‘ऑक्सफॉम’ या ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने सोमवारी केले. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पुन्हा दावोस समितीची बैठकीचे आयोजन केले आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) बैठकीसाठी जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित वर्ग एकत्र आला आहे. त्यामध्ये मत मांडताना ‘ऑक्सफॉम’ने म्हटले आहे की, गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांवर कर लावण्याची वेळ आली आहे.
यावर्षी २६.३ कोटी लोक दारिद्र्य पातळीच्या खाली आले आहेत. तुलनात्मकरीत्या कोरोनासाथीच्या काळात ५७३ लोक अब्जाधीश बनले आहेत किंवा दर ३० तासाला एक व्यक्ती धनाढ्य बनले आहेत. कोरोनाकाळात वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक खर्चाचे संकट मोठे होते. संपत्तीत अविश्वसनीय वाढ झाल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी अब्जाधीश दावोसला पोहोचत आहेत, असे ‘ऑक्सफॉम’च्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी सांगितले. आधी कोरोनाची साथ आणि आता अन्नधान्य व ऊर्जेच्या किमतीत झालेली मोठी वाढ त्यांच्यासाठी ‘बोनस’ आहे, असेही त्या म्हणाल्या.
‘ऑक्सफॉम’चे मत
कोरोनातील महागाईचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदतीसाठी श्रीमंतांवर ‘एकता कर’ लागू करावा.
नफाखोरी थांबविण्यासाठी बड्या उद्योगांच्या अनपेक्षित नफ्यावर ९० टक्के तात्पुरता जादा नफा कर लादावा.
कोट्यधीशांच्या संपत्तीवरील २ टक्के आणि अब्जाधीशांवरील पाच टक्के वार्षिक करातून दर वर्षी दोन हजार ५२० अब्ज डॉलर एवढा निधी जमा होईल.
या संपत्ती कराचा वापर २.५ अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी करता येईल.
या पैशातून जगात पुरेशा लशी उपलब्ध करता येतील.
गरीब देशांमधील सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठीही त्याचा उपयोग करता येईल.
दारिद्र्य कमी करण्याच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांना यश आले असतानाच आता उलट परिणाम दिसत आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच्या खर्चात अशक्य वाढ झाल्याने लाखो लोकांसमोर संकट निर्माण झाले आहे.’’
- गॅब्रिएला बुचर, कार्यकारी संचालक, ऑक्सफॉम
Web Title: Oxfam Conclusion Corona Adds Up Billionaire In 30 Hours Inflation Tax On Rich People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..