Oxford च्या कोरोना वॅक्सिनची पहिली मानवी चाचणी यशस्वी

सूरज यादव
बुधवार, 15 जुलै 2020

अमेरिकेतील मॉडर्नानंतर आता ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोना व्हॅक्सिन तयार करण्यात यश मिळवलं आहे. 

लंडन - अमेरिकेतील मॉडर्नानंतर आता ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोना व्हॅक्सिन तयार करण्यात यश मिळवलं आहे. ऑक्सफर्डच्या औषधामुळेसुद्धा कोरोना विरोधात प्रतिकार क्षमता तयार झाली आहे. ऑक्सफर्डचे संशोधकांना फक्त वॅक्सिन तयार करण्यात यश मिळण्याबद्दलच आशावादी आहेत असं नाही तर त्यांना असाही विश्वास आहे की सप्टेंबर पर्यंत वॅक्सिन उपलब्ध होईल. ऑक्सफर्डच्या वॅक्सिनचे उत्पादन AstraZeneca करणार आहे.

ऑक्सफर्डच्या चाचणीचे निकाल अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आलेले नाही. गुरुवारी याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे. याची ट्रायल 15 जणांवर कऱण्यात आली होती. येत्या आठवड्यात जवळपास 200 ते 300 जणांवर याची ट्रायल केली जाईल. दावा करण्यात आला आहे की, ऑक्सफर्डमध्ये ज्या लोकांना वॅक्सिन देण्यात आलं होतं त्यांच्यात अँटिबॉडी आणि व्हाइट ब्लड सेल्स तयार झाल्या आहेत. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास शरिरात प्रतिकार शक्ती तयार होते. 

हे वाचा - कोरोनाचं आणखी एक लक्षण आलं समोर, वैज्ञानिकांनी दिली माहिती

विशेश म्हणजे वॅक्सिनच्या माध्यमातून अँटिबॉडी निर्माण होण्याकडं लक्ष दिलं जातं मात्र ऑक्सफर्डच्या वॅक्सिनमध्ये अँटीबॉडीसह व्हाइट ब्लड सेल्ससुद्धा तयार होत आहेत. सुरुवातीच्या ट्रायल्समध्ये कोणतंही नुकसान न होता यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याची टेस्ट करण्यास सुरुवात होईल. या वॅक्सिनच्या ट्रायलमध्ये ब्रिटनमध्ये 8 हजार आणि ब्राझिल, दक्षिण आफ्रिकेत 6 हजार लोकांचा समावेश आहे. ऑक्सफर्डच्या वॅक्सिनची ब्रिटनमध्ये सर्वात आधी मानवी चाचणी घेण्यात आली होती. 

याआधी अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या कोरोना व्हायरस वॅक्सिनला पहिल्या ट्रायलमध्ये यश मिळालं आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखात म्हटलं आहे की, 45 निरोगी लोकांवर या वॅक्सिनची चाचणी करण्यात आली. त्याचे परिणाम चांगले असल्याचं समोर आलं आहे. या वॅक्सिनमुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडी तयार झाले. 

हेही वाचा : जर तुमच्यात ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता असल्यास हे उपाय कराच

मॉडर्ना सध्या कोरोना व्हायरस वॅक्सीनची लेट स्टेज ट्रायलची तयारी करत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 27 जुलैच्या दरम्यान याची ट्रायल सुरु केली जाण्याची शक्यता आहे. याचे कोणतेही मोठे साइड इफेक्ट न दिसल्यानं वॅक्सिनची ट्रायल रोखली जाण्याची शक्यता कमी आहे. ट्रायलवेळी तीन डोस दिल्यानंतर अर्ध्याहून अधिक लोकांचा अशक्तपणा, शरिरात होणाऱ्या वेदना आणि डोकेदुखी कमी झाली. जवळपास 40 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर हलकासा ताप आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxford coronavirus vaccine report could come tomorrow