कोरोनाचं आणखी एक लक्षण आलं समोर, वैज्ञानिकांनी दिली माहिती

new symptoms of covid claim by researchers
new symptoms of covid claim by researchers

लंडन - चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप यावर कोणत्याही प्रकारची लस तयार झालेली नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. भारतातही गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या लक्षणांबाबत जगभरात संशोधन केलं जात आहे. आता ब्रिटनमधील मेडिकल संशोधकांनी कोरोना व्हायरसचं नवं लक्षण शोधल्याचा दावा केला आहे.

कोरोनाच्या नव्या लक्षणाची माहिती दिल्यानंतर नॅशनल हेल्थ सर्व्हिसकडे अशीही मागणी केली आहे की, कोरोनाच्या अधिकृत लक्षणांच्या यादीमध्ये याचा समावेश करण्यात य़ावा. संशोधकांचे म्हणणे आहे की, त्वचेवर ओरखडे उठल्यासारखे दिसणे हे सुद्धा कोरोनाचे लक्षण असू शकते. 

संशोधकांनी कोरोनाच्या नव्या लक्षणाबाबत अभ्यास केला होता. त्यामध्ये असंही आढळून आलं की, प्रत्येक 11 पैकी एका कोरोना रुग्णाच्या त्वचेवर ओरखडे असल्याचं दिसून आलं. संशोधनाचे प्रमुख डॉक्टर मारियो फाल्ची यांनी सांगितलं की, कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये स्कीन रॅशेसची समस्या बघायला मिळाली. 

किंग्ज कॉलेज लंडनमधील संशोधकांनी 20 हजार लोकांचा अभ्यास केला. यामध्ये त्या लोकांचा समावेश होता ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच काही लोक कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याचंही मानलं जात होतं. अभ्यासावेळी अशी माहिती समोर आली की, ब्रिटनमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्यापैकी 9 टक्के लोकांमध्ये स्कीन रॅशेसची समस्या आहे. तर 8 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या इतर लक्षणांशिवाय स्कीन रॅशेसही दिसून आले. 

सध्या ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अधिकृत यादीमध्ये कोरोनाची फक्त तीनच लक्षणं आहे. यामध्ये ताप, सतत खोकला आणि वास-चव ओळखण्याची शक्ती कमी होणे यांचा समावेश आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळावर कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप, अशक्तपणा आणि कोरडा खोकला यांची माहिती दिली आहे. याशिवाय काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास, शरिरामध्ये वेदना, सर्दी, गळा खराब होणं किंवा डायरियाची लक्षणं यांबद्दलही सांगण्यात आलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा वाटणे यांचा समावेश केला आहे. इतर लक्षणांमध्ये शरीरात वेदना होणं, सर्दी, डोकेदुखी, गळ्यात त्रास होण, डायरिया, चव ओळखण्याची क्षमता कमी होणं, स्कीन रॅशेस, बोटांचा रंग बदलणं इत्यादी लक्षणांचा समावेश केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com