esakal | कोरोना लस संशोधनात चिंपांझीची मदत; जाणून घ्या लस कशी काम करणार
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccine

कोरोना वॅक्सिनची मानवी चाचणी सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक इम्युन सिस्टिम तयार करण्याचं काम या वॅक्सिनमुळे होते.

कोरोना लस संशोधनात चिंपांझीची मदत; जाणून घ्या लस कशी काम करणार

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी वॅक्सिनच्या संशोधनाला यश आल्याचा दावा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. यामुळे कोरोनाच्या या संकटात आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 6 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावर वॅक्सिनसाठी संशोधन केलं जात आहे. यात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वॅक्सिन चाचणीबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोना वॅक्सिनची मानवी चाचणी सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक इम्युन सिस्टिम तयार करण्याचं काम या वॅक्सिनमुळे होते. 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोरोना वॅक्सिनची मानवी चाचणी आणि त्याचे परीक्षण केल्यानंतर अशी गोष्ट समोर आली की, यामुळे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. वॅक्सिन सुरक्षित असून इम्युन सिस्टिमला ट्रेन करते. कोरोनावर वॅक्सिनच्या चाचणीसाठी 1077 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांना वॅक्सिनचा डोस दिल्यानंतर त्यांच्यात होणाऱ्या बदलांचे आणि परिणामांचे परीक्षण करण्यात आले. 

वॅक्सिनचा डोस दिलेल्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी आणि पांढऱ्या पेशी तयार होतात. यामुळे कोरोनाशी लढण्याची ताकद त्या लोकांच्या शरीरात निर्माण झाली. वॅक्सिनबाबतचे निष्कर्ष सध्याच्या या संकटात आनंद देणारे असेच आहेत. मात्र अद्याप या वॅक्सिनची मोठ्या प्रमाणावर चाचणी कऱण्यात येत आहे. त्याचे परीक्षण केल्यानतंर हे वॅक्सिन किती प्रभावी आहे हे समजू शकेल. ब्रिटनने आधीच या वॅक्सिनच्या 10 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. 

हे वाचा - सगळ्यांत आनंदाची बातमी; ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोनावर लस शोधण्यात यश

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वॅक्सिनचं संशोधन खूपच कमी वेळेत केलं आहे. वॅक्सिन तयार कऱण्यासाठी चिंपांझीची मदत झाली आहे. वॅक्सिन ChAdOx1 या व्हायरसपासून तयार झालं आहे. कोल्ड व्हायरसचं एक व्हर्जन आहे.  चिंपांझीमध्ये सर्दी, ताप येण्यास हा व्हायरस कारणीभूत ठरतो. यामध्ये जेनेटिकली बदल घडवून हे वॅक्सिन तयार करण्यात आलं. यात उच्च स्तरावर बदल कऱण्यात आले. ज्यामुळे लोकांमध्ये याचा संसर्ग होणार नाही आणि कोरोना व्हायरस सारखेच दिसेल.