Nepal l नेपाळमध्ये भीषण स्फोट; दोन भारतीयांचा जागीच मृत्यू,सहाजण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cylinder Explosion

नेपाळमध्ये भीषण स्फोट; दोन भारतीयांचा जागीच मृत्यू,सहाजण गंभीर

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) औद्योगिक परिसरात ऑक्सिजन प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. काठमांडूजवळील (Kathmandu) ललितपूर जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील सागरमठ याठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत्यू झालेले दोघे बिहारचे रहिवासी आहेत.

हेही वाचा: अफगाणिस्तानच्या मशिदीत मोठा स्फोट; स्फोटात 20 हून अधिक जणांचा मृत्यू

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, स्फोट इतका भयंकर होता की अनेक सिलिंडर हवेत उडाले. यातच ब्रिज कुमार महतो (वय-४५) आणि राजकुमार महतो (वय-२५) या दोन भारतीयांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा नेपाळी नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना ललितपूर येथील बी अँड बी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री बाळकृष्ण खांड यांनी पोलिसांना तातडीने मदतकार्य सुरू करून अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा मारियापोलवर कब्जा

ललितपूरचे जिल्हा दंडाधिकारी घनश्याम उपाध्याय यांनी सांगितले की, स्फोटाची भीषणता इतकी होती की अनेक सिलिंडर हवेत उडाले आणि शेजारच्या तीन-चार मजली इमारतीच्या खिडकीवर आदळले. यातच भारतीय नागरीकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Oxygen Plant Explosion In Nepal 2 Indian Died Citizen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top