Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा मारियापोलवर कब्जा

रशिया-युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटला आहे.
Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा मारियापोलवर कब्जा

किव्ह : रशिया-युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटला असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक इतर गोष्टींच्या नुकसानानंतरदेखील या दोन्ही देशातील युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे रशियाने युक्रेनमधील मारियापोल (Mariupol) नावाचे शहरावर संपूर्णपणे ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्वत: मारियुपोल शहरावर विजय घोषित केला आहे. पुतिन यांनी या शहराला स्वतंत्र घोषित केले आहे. (Russia Ukraine War News )

तत्पूर्वी, रशियाने युक्रेनचे बंदर शहर असलेल्या अझोव्स्टल स्टील प्लांटवरदेखील कब्जा केला आहे. यानंतर या प्लांटवर बॉम्बवर्षाव केला जाऊ नये असे आदेश रशियन सैनिकांना देण्यात आले असून, या प्रकल्पाला सुरक्षितरित्या ब्लॉक करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच येथून एक माशीदेखील बाहेर उडता कामा नये, असे सक्त आदेशही रशियन सैनिकांना पुतिन यांनी दिले आहेत. रशियाने युक्रेनचे बंदर शहर असलेल्या अझोव्स्टल स्टील प्लांटचा ताबा घेतला आहे.

अझोव्ह समुद्रात स्थित मारियुपोलचे पूर्ण नियंत्रण, रशियासाठी एक मोठा धोरणात्मक विजय आहे, असे रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी सांगितले. यामुळे पूर्व युक्रेनमधील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील प्रदेश क्रिमियाशी जोडला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, जो पूर्वी युक्रेनने जोडलेला होता. जवळपास एक महिन्यापासून रशियन सैन्याने वेढा घातलेल्या या शहरात हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. या स्टील प्रकल्पात २ हजार युक्रेनी सैनिक असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com