पाकिस्तानात 2 शीख व्यक्तींची हत्या; अकाली दलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shot Dead

पाकिस्तानात 2 शीख व्यक्तींची हत्या; अकाली दलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव

पेशावर : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये दोन शीख बांधवांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पेशावरमधील सरबंद भागात रविवारी घडली. अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असून हत्या करण्यात आलेले दोघेजण सरबंद येथील बाटा ताल बाजारात मसाले विकणारे दुकानदार होते, असं पोलिसांनी सांगितलं.

(Two Shikh's Shot Dead In Peshawar Pakistan)

कुलजीत सिंग (42) आणि रणजीत सिंग (38) अशी जखमींची नावे असून त्यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केल्याचं सांगितलं. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून दोषींना अटक करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान पेशावरच्या या भागात शीख समाजातील जवळपास १५ हजार लोकं राहतात. त्यामधील बहुतेक लोकं व्यवसाय करतात.

हेही वाचा: मुंबईत बालार्ड पिअर बंदरावर मालवाहू बोट बुडाली; ३ जण सुखरुप बाहेर

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबरसिंग बादल यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे पाकिस्तानातील शीखांच्या सुरक्षेबाबत पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "रणजितसिंग आणि कुलजीत सिंग या दुकानदारांच्या हत्या झाल्याचं ऐकून मला धक्का बसला. मी भारताचे परराष्ट्रमंत्र्याकडे मागणी करतो की पाकिस्तान सरकारशी संपर्क करून मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा." असं ट्वीट त्यांनी केलं.

पाकिस्तानातील मुख्यमंत्री महमूद खान यांनी या घटनेचा निषेध करत हे दोन समाजातील सलोखा बिघडवण्यासाठी केले गेलेले कृत्य आहे असं ते म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मागच्या वर्षी पेशावरमध्ये एका शीख बांधवाची क्लिनिकमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

हेही वाचा: '...तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते'; नितेश राणेंचा हल्लाबोल

पाकिस्तानमध्ये याआधी अनेकवेळा शीखांच्या हत्या झाल्या आहेत. २०१८ मध्ये शीख समुदायाचे प्रमुख सदस्य चरणजीत सिंग यांची पेशावरमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच २०२० मध्ये रविंदर सिंग नावाच्या टीव्ही अँकरची हत्या करण्यात आली होती. 2016 मध्ये Pakistan Tehrik-e-Insaf National Assembly चे सदस्य सोरेन सिंग यांचीही पेशावरमध्ये हत्या झाली होती. 2017 च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमध्ये हिंदू हे सर्वात मोठे धार्मिक अल्पसंख्याक असल्याचं समोर आलं आहे.

Web Title: Pakistan 2 Shikh Shot Dead In Peshawar S Jayshankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistanmurder
go to top