'...तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते'; नितेश राणेंचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane-CM Uddhav Thackeray

'...तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते'; नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : काल मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून फटकारलं आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

(MLA Nitesh Rane On CM Uddhav Thackeray)

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी "आपले अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री केंद्रावर टीका करत आहेत. आज राज्यातील मुलं बेरोजगार आहेत आणि तुम्ही असं वक्तव्य करत असाल तर त्याला काय अर्थ आहे." असं म्हणत फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की "तुम्ही दुसऱ्यांच्या वजनावर बोलता तर तुमच्या मुलाच्या आवाजावर वक्तव्य केलं तर वाईट का वाटतं? तुम्हीही तुमच्या वजनाने वाऱ्याने उडून गेले असते, असं म्हटलं तर चालेल का?" असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली.

हेही वाचा: आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणण्याची वेळ बाळासाहेबांवर आली नाही - दानवे

"स्वत:च्या कुटुंबाची बदनामी मुख्यमंत्र्यांनी करून नये. तुमच्या नाकाखाली साधुंची हत्या होते, दंगली होतात, वीजेचा प्रश्न आहे, राज्यात इतके मुद्दे असतानागी त्यावर तुम्ही काही बोलत नाहीत अन् हिंदुत्वावर बोलताय, तुमच्या बुडाखालचा अंधार बघा. आपलं अपयश झाकण्यासाठी तुम्ही केंद्रावर टीका करता पण केंद्रामुळे तुम्हाला काही सुविधा मिळता त्यावर का बोलत नाहीत." असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: "बरं झालं तुम्ही मनसे..."; रोहित पवारांनी वसंत मोरेंच्या कानात सांगितलं

"तुम्ही आमच्यावर खोटेनाटे आरोप करत असाल, धमक्या देत असाल तर आमचे नेते त्याला उत्तर देणारंच. आम्ही गप्प बसणारे लोकं नाहीत, तुम्ही वाघनखं दाखवा, बोटं छाटा पण तुम्ही फक्त पोलिसांना बाजूला करा मग कुणाचे किती बोटं राहतात आपण बघून घेऊ." असा इशारा शिवसेनेला करत आजच्या भाजपाच्या सभेत पक्षाचे नेते शिवसेनेला उत्तर देणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं.

दरम्यान कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर अनेक भाजप नेत्यांनी टीका केली असून आज भाजपाची मुंबईत सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेवर पक्षाचे नेते उत्तर देणार असल्याचं बोललं जातंय.

Web Title: Mla Nitesh Rane On Cm Uddhav Thackeray Mumbai Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top