पाकिस्तानच्या इतिहासात घडली 'ही' पहिल्यांदाच घटना; काय झाले?

वृत्तसंस्था
Tuesday, 5 May 2020

  • पाकिस्तानच्या वायुसेनेत हिंदू पायलटची नियुक्ती

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू युवकाची वायुसेनेत पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. ही पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. राहुल देव या युवकांची पाकिस्तानी वायुसेनेत जीडी (जनरल ड्यूटी) पायलट अधिकारी म्हणून भरती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल देव सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या थरपारकर येतील राहणारा आहे. पाकिस्तानमधील थरपारकर या भागात हिंदू समुदाय मोठ्या संख्येने राहतात. विकासापासून वंचित असलेल्या या भागातील राहुल हा पाकिस्तान हवाई दलात नियुक्ती होणारी पहिले व्यक्ती आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Coronavirus :  'या' राज्यात एका दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दारू विक्री

अल्पसंख्याक समाजातील अनेक सदस्य नागरी सेवेसह, सेनेच्या इतर भागातही सेवा बजावत आहेत. विशेषत: देशातील अनेक मोठे डॉक्टर हिंदू समुदायाचे आहेत, असे 'ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत'चे सचिव रवि दवानी यांनी राहुल यांच्या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त करताना म्हटले आहे. सरकारने अल्पसंख्याकांकडे लक्ष दिले, तर येत्या काळात अशाप्रकारचे अनेक राहुल देव देशाची सेवा करण्यास तयार असतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Air Force Gets its First Hindu Pilot after Rahul Dev Chosen as General Duty Officer