
Pakistan Latest News: राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटाचा सामना पाकिस्तान करत असतानाच, आता एका नव्या संकटाने पाक सरकारला घेरले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने बलुचिस्तान प्रांतातील 'सुराब' शहरावर पूर्णपणे कब्जा केल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा दलांची हतबलता पुन्हा एकदा समोर आली आहे.