

Horrific collision between passenger bus and gas tanker in Pakistan's Balochistan.
Sakal
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यात प्रवासी बस आणि एलपीजी (LPG) गॅस टँकर यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. गुरुवारी (१९ नोव्हेंबर २०२६) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास मकरान कोस्टल महामार्गावर (N-10) ही दुर्घटना घडली. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.