
लाहोरः पाकिस्तानने बुधवारी सायंकाळी अफगाणिस्तानातील काबूलसह स्पिन बोल्दाक या भागामध्ये जोरदार बाँब वर्षाव केला. या हल्ल्यामध्ये चोवीसपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडोजण जखमी झाल्याचे समजते. पाकच्या या हल्ल्यांना अफगाणिस्तानने देखील सडेतोड उत्तर देत ड्रोनच्या माध्यमातून पेशावरला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये ४८ तासांची शस्त्रसंधी करण्यात आली.