Pakistan Crisis : पाकिस्तानात चिकन, गव्हाची किंमत पाहून अवाक व्हाल...

Pakistan Crisis
Pakistan Crisis

कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाल्याचे आपण पाहीले. जगाने लॉकडाऊनचा देखील सामना केला. मात्र आता अनेक देशात सुरळीत परिस्थिती आहे. कोरोनातून लोकांनी मोकळा श्वास घेतला. मात्र पाकिस्तान देश अजून डबघाईला आला आहे.  (economic crisis in pakistan)

पाकिस्तानात दोन घास भाकरीसाठी मारामारी सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. तेथील सामान्य नागरीकांची जगण्यासाठी धावपळ सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य नाही.

शाहबाज शरीफ सरकारकडून गरिबांना कोणतीही मोठी मदत झालेली नाही. पाकिस्तानातील अन्नधान्य महागाईत सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: २०२२ साली आलेल्या महापुरानंतर अन्नधान्य महागाईची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान इतर देशांच्या मदतीची मागणी करत आहे. लष्करप्रमुख आसिम मुनीर सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. 

मात्र पाकिस्तानवर आधीच कर्जाचा मोठा डोंगर आहे. तसेच आर्थिक बाबतीत पाकीस्तानचे आळशी धोरण आणि राजकीय अस्थिरता लक्षात घेता कोणीही पाकिस्तानच्या मदतीला येत नाही आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी देखील पाकिस्तानला मदत करत नाही. त्यामुळे पाकिस्तान आता श्रीलंकेच्या वाटेवर जात आहे. 

Pakistan Crisis
Maharashtra Politics: संजय राऊतांच महाराष्ट्रसंदर्भात मोठं विधान; 'देशातील सर्वात असुरक्षित राज्य'

पाकिस्तानात गहू देखील महागले आहे. पिठाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. गोर - गरिबांना भाकरी मिळणेही कठीण झाले आहे. मात्र पाकिस्तानचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे कोणतेही संकट नसल्याचे पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. पुरामुळे गव्हाच्या पिकाचे जास्त नुकसान झाले नाही असे त्यांचे मत आहे. 

Pakistan Crisis
Solapur : लम्पीच्या भीतीने यंदा गड्डा यात्रेत फक्त म्हशीच

पाकिस्तान मधील इंग्रजी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार रावळपिंडीच्या बाजारपेठेत पिठाची किंमत १५०  रुपये किलोवर पोहोचली आहे. १५ किलो पिठाची पोती २ हजार २५० रुपयांपर्यंत विकली जात आहे.

त्याचवेळी लाहोरमध्ये पिठाची किंमत १४५ रुपये किलोवर पोहोचली आहे. इतर शहरांमध्येही अशीच परिस्थिती आहे. याव्यतिरिक्त चिकन ६५० रुपये किलो, गॅस सिलेंडर १०००, साखर व तुपाच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. 

Pakistan Crisis
Devendra Fadnavis: अमृता वहिनींच गाणं ऐकल्यावर देवेद्रजींचा मूड कसा होता?

देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती -

पाकिस्तानचे अधिकारी या परिस्थितीवर मात मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विजेचा कमी वापर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तान सरकारने देशातील बाजार साडेआठपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. यामध्ये हॉटेलचा देखील समावेश आहे. तसेच मॉल आणि मंगल कार्यालये रात्री १० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Pakistan Crisis
IND vs Sl: कर्णधार रोहित शर्मा टी-20 क्रिकेटला करणार अलविदा? पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com