
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) ठपका ठेवलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास असमर्थ ठरलेल्या पाकिस्तानला वित्तीय कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) ‘ग्रे लिस्ट’मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिसमध्ये संघटनेच्या व्हर्चुअल बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याचे एफएटीएफ संस्थेचे अध्यक्ष मार्कुस प्लेअर यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर हा पाकिस्तानला मोठा धक्का मानला जातो. जर्मनीच्या अध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये पार पडलेल्या एफएटीएफ संस्थेच्या पाच दिवसीय बैठकीत या निर्णय घेण्यात आला. दहशतवाद्यांना होत असलेला वित्तपुरवठा रोखण्यात पाकिस्तानला अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यामुळेच त्यांचा ग्रे लिस्टमधील समावेश कायम ठेवला आहे.
जमात-ऊद-दावाचा म्होरक्या हाफीज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यांच्यावर कारवाई न केल्यामुळे पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये कायम ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने शुक्रवारी घेतला. वित्तीय कारवाई कृती दल म्हणजेच एफएटीएफ ही मनीलॉण्डरिंग आणि दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याविरोधातील जागतिक संघटना आहे.
2018 मध्ये पाकिस्तानला 27 मुद्द्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. पण पाकिस्तानने 26 मुद्द्यांचीच पूर्तता केली आहे. यूएनने जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या हाफीज आणि मसूदवर कारवाई करावी, असे एफएटीएफने पाकिस्तानला सांगितले होते. पण पाकिस्तानने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मनीलॉण्डरिंगच्या धोक्याला आळा घालण्यात पाकिस्तान असमर्थ ठरल्याने भ्रष्टाचार आणि दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचा ग्रे यादीतील समावेश कायम ठेवण्यात आला आहे, असे प्लेअर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.