
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची अवस्था अधिक बिकट झाली आहे. एका बाजूला भारताच्या प्रभावी प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या लष्करी ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत असंतोषाचा ज्वालामुखी उफाळून आला आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनेने पाकिस्तानी सैन्याच्या ठाण्यांवर मोठा हल्ला चढवला असून, मोक्याची गॅस पाइपलाइनही उडवून दिली आहे.