पाकिस्तान आहे तरुणांचा देश

Pakistan currently has largest percentage of young people in its history: report
Pakistan currently has largest percentage of young people in its history: report

इस्लामाबादः पाकिस्तानच्या इतिहासामध्ये सध्या युवकांची संख्या वृद्धांपेक्षा काही पटिंनी वाढली आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानव विकासने अहवालाद्वारे बुधवारी (ता. 2) जाहिर केली आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या युवकांची संख्या सर्वाधिक आहे. अहवालातील आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या 64 टक्क्यांमध्ये 30 टक्के युवक हे 30 वर्षांच्या आतमधील वयोगटातील आहेत. 15 ते 29 वयोगटातील युवकांची संख्या ही 29 टक्के आहे. जगामध्ये सर्वाधिक युवक असणाऱया देशांपैकी पाकिस्तान हा एक देश ठरला आहे. आशिया खंडामध्ये अफगणिस्तानमध्ये हा दुसऱया स्थानकावर आहे.

पाकिस्तानमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक असली तरी शिक्षणाची गुणवत्ता, रोजगार आणि अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देऊन युवकांना गुंतवूण ठेवणे सरकारपुढे मोठे आव्हान असणार आहे. युवकांचा चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या मानवी विकास विभागाकडे मोठे आव्हान असणार आहे. युवकांच्या दृष्टिकोनातून संधी समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मानवी विकासाचे परिणाम कसे सुधारित करावेत, युवकांना सक्षम करून, अडचणींच्या मूळ कारणांना संबोधित करून आणि आव्हाने दूर करण्यासाठी विविध मार्ग तयार करावे लागणार आहेत. भविष्यात युवकांच्या रोजगाराची समस्या भेडसावणार आहे.

या अहवालात म्हटले आहे की, '90 टक्के युवकांना मनोरंजक सुविधा मिळत नाहीत. देशातील केवळ 15 टक्के युवकच इंटरनेटचा वापर करत आहेत. देशातील नागरिक 8 टक्के रेडिओ व 48 टक्के मोबाइल वापरत आहेत.'

गृहमंत्री अहसन इक्बाल यांनी सांगितले की, 'युवकांच्या निर्णय प्रक्रियेच्या सर्व स्तरांवर युवकांना समाविष्ट करणे आवश्यक आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com