esakal | ...म्हणूनच पाकिस्तानमध्ये गाढवांना मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

donkey

देशांतर्गत अनेकजण आजही विविध कारणांसाठी गाढवांचा वापर करतात. मोटारींपेक्षा गाढवांना मोठी मागणी आहे. देशात ठिकठिकाणी गाढवांचे बाजारही भरलेले दिसतात.

...म्हणूनच पाकिस्तानमध्ये गाढवांना मागणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये प्रवासासह विविध कामांसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठे आहे. गाढवांच्या मागणीचे कारणही तसेच आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडत नाहीत, यामुळे गाढवांना मोठी मागणी असल्याचे एक कारण आहे.

पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरामध्ये रविवारी (ता. 31) 6.45 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे डिझेलचे दर 117.43 रुपये प्रति लिटर तर पेट्रोलचा दर 98.89 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांमधील ही सर्वांत मोठी वाढ आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने परवडत नाहीत. महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

'इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे देशांतर्गत अनेकजण आजही विविध कारणांसाठी गाढवांचा वापर करतात. मोटारींपेक्षा गाढवांना मोठी मागणी आहे. देशात ठिकठिकाणी गाढवांचे बाजारही भरलेले दिसतात. प्रवासासह विविध कामांसाठी गाढवांचा वापर केला जात आहे. इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे आजही गाढवांना मोठी मागणी आहे,' असे नागरिक सांगतात.

loading image