पाकिस्तान : बलुचिस्तान भूकंपानं हादरलं; 80 हून अधिक घरं कोसळली, 200 कुटुंबं बेघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baluchistan earthquake

बलुचिस्तान भूकंपानं हादरलं; 80 हून अधिक घरं कोसळली

पाकिस्तानातील (pakistan) बलुचिस्तान प्रांतात भूकंपाने (earthquake) मोठी हानी झाली आहे. ५.२ तीव्रतेच्या भूकंपानंतर खुजदार जिल्ह्यात किमान ८० घरे कोसळली. तसेच २०० हून अधिक कुटुंबे बेघर झाली, असे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहे. भूकंपाचे (earthquake) धक्के जवळपास अर्धा मिनिटांपर्यंत जाणवल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. (pakistan earthquake damage over 80 houses in balochistan)

भूकंपाचा केंद्रबिंदू औरंजीजवळ होता. शुक्रवारी सकाळी ११.५५ वाजता भूकंपाचे हे (earthquake) धक्के जाणवले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले आणि उघड्यावर पळू लागले. मोठ्या धक्क्यानंतर परिसरात थोड्या-थोड्या अंतराने भूकंपाचे काही धक्के जाणवले. औरंजीचा मोठा भाग भूकंपामुळे प्रभावित झाला आहे. भूकंपामुळे ८० हून अधिक घरे पडली. तर सुमारे २६० घरांना मोठ्या भेगा पडल्या. बहुतेक घरे कच्ची होती. वाध तालुक्‍यातील नल, जामरी, बरंग आणि नचकन सोनारो लाठी या गावांचेही भूकंपामुळे नुकसान झाले आहे, असे खुजदारचे उपायुक्त, सेवानिवृत्त मेजर इलियास किबझाई यांनी डीएएनला सांगितले.

हेही वाचा: नशा न झाल्याने दारूमध्ये भेसळीचा संशय; दारुड्याने गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

सुदैवाने भूकंपामुळे कोणीही मरण पावले नाही. कारण, बहुतेक लोक कामासाठी घराबाहेर गेले होते. घरात जे होते ते लगेच बाहेर धावले. २०० हून अधिक कुटुंबे बेघर झाल्याचे किबझाई म्हणाले. भूकंपाची माहिती मिळताच भूकंपग्रस्त (earthquake) लोकांसाठी तंबू, चादरी, खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी यासह मदत सामग्री पाठवण्यात आली आहे.

बलुचिस्तानचे (balochistan) मुख्यमंत्री मीर अब्दुल कुदूस बिझेन्जो यांनी भूकंपामुळे (earthquake) स्थानिक लोकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली आणि स्थानिक प्रशासन आणि प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला भूकंपग्रस्त भागात तातडीने प्रभावी मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले. बाधित घरांतील रहिवाशांना तंबू, ब्लँकेट आणि इतर आवश्यक गोष्टी तातडीने पुरवण्याचे निर्देश दिले. या कठीण प्रसंगी सरकार पीडितांच्या पाठीशी उभे आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: ‘तुम्ही वायनाडमधूनही हराल’ असे म्हणत ओवैसी राहुल गांधींना म्हणाले...

मदत पथकांना पोहोचण्यात अडचणी

बाधित गावे डोंगराळ भागात असल्याने बचाव आणि मदत पथकांना पोहोचण्यात अडचणी येत आहेत. आम्ही औषधांसह आरोग्य पथके पाठवली आहेत. बाधित कुटुंबांना आपत्कालीन निवारा देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे इलियास किबझाई म्हणाले.

Web Title: Pakistan Earthquake Damage Over 80 Houses In Balochistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top