
Pakistan News: पाकिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. गेल्या आठवड्याभरातला हा दुसरा भूकंप आहे. या भूकंपात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.