
लाहोर : मुसळधार पावसाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला जोरदार तडाखा दिला असतानाच भारताने दोन धरणांमधून विसर्ग सोडल्याने अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिनाब, रावी आणि सतलज नद्यांच्या पुरात अडकलेल्या तीस हजारांहून अधिक नागरिकांची बचाव पथकांनी सुटका केली आहे.