पाकिस्तान ‘ग्रे’ लिस्टमध्ये

पीटीआय
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

केवळ पाच निकषच पूर्ण
लष्करे तैयबा, जैशे महंमद यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासंदर्भात निश्‍चित करून देण्यात आलेल्या २७ अटींपैकी केवळ पाच अटींची पूर्तता करण्यात पाकिस्तानला यश आले आहे. या आघाडीवर पाककडून फारच संथ गतीने प्रगती सुरू असल्याने या संस्थेने तेथील सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेल्या इराणसाठी जी भाषा ‘एफटीएफ’ने वापरली होती, त्याच भाषेचा पुन्हा पाकला सुनावण्यासाठी वापर करण्यात आला आहे.

पॅरिस - दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या पॅरिसस्थित आर्थिक कृती पथकाने (एफटीएफ) पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानने दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा वेळेत रोखला नाही तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे. 

‘एफटीएफ’च्या पाचदिवसीय खुल्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या संघटनेकडूनच अन्य वैश्‍विक वित्तीय संघटनांना देखील नोटीस पाठविण्यात आली असून, या संघटनांनी २०२० पर्यंत पाकिस्तानला केली जाणारी मदत थांबवावी, असा इशारा देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan in Gray List