esakal | पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

इम्रान यांनी आपली मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कॅपीटॉल हिल या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीची मदत घेतली होती. पाकच्या दहशतवादी धोरणाची झळ बसलेल्या भारताने शुक्रवारच्या बैठकीच्या प्रारंभीच या घडामोडींना दिशा दिली.

पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पॅरिस - इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले असून आणखी खूप काही करण्याची गरज असल्याचेही सुनावले. भारताचा आक्रमक पवित्रा यात महत्त्वाचा ठरला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक कृती कार्य दल (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ) या संघटनेने हा निर्णय घेतला. पाकला २७ कलमी कृती योजनेवर कार्यवाही करण्यात अपयश येणे हे याचे मुख्य कारण आहे. इम्रान यांनी आपली मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कॅपीटॉल हिल या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीची मदत घेतली होती. पाकच्या दहशतवादी धोरणाची झळ बसलेल्या भारताने शुक्रवारच्या बैठकीच्या प्रारंभीच या घडामोडींना दिशा दिली. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सुरक्षित आश्रयाचे ठिकाण असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर, लष्करे तैबाचा कारवाया तडीस नेणारा म्होरक्या झकीउर रेहमान लखवी आणि दाऊद इब्राहीम अशा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या यादीत समावेश झालेल्या दहशतवाद्यांची उदाहरणे दिली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जून २०१८ मध्ये पाकिस्तानला या यादीत टाकले होते. दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यात सातत्याने अपयश येत असल्याबद्दल लाल ध्वज उंचावण्यात आला होता. दहशतवाद्यांवरील कारवाईच्या मार्गात कायदेविषयक चौकटीतील त्रुटी दूर करण्यात अपयश आल्याचा ठपकाही ठेवला होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकचा पर्दाफाश
 जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने कोणतीही चिथावणी नसताना तीन हजार आठशे वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमारेषेवर शस्त्रास्त्रे टाकणे, ड्रोनचा वापर करून आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्रांची तसेच अंमली पदार्थांची तस्करीही पाक करीत असल्याची माहिती भारताकडून देण्यात आली.

loading image
go to top