पाकिस्तान: हफीझ सईदच्या राजकीय पक्षास मान्यता...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

सईद हा जागतिक दहशतवादी असल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघानेही दहा वर्षांपूर्वीच सईद याचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. सईद याला गेल्या सुमारे वर्षभर (2017) पाकिस्तानमध्ये नजरकैदेतही ठेवण्यात आले होते

इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागचा (26/11) मुख्य सूत्रधार हफीझ सईद याने स्थापन केलेल्या मिली मुस्लिम लीग या संघटनेस राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी, असे निर्देश पाकमधील न्यायालयाने येथील निवडणूक आयोगास दिले आहेत.

जमात उद दावाच्या या म्होरक्‍याच्या अटकेवर आणण्यात आलेल्या "स्टे'ची मर्यादा न्यायालयाने नुकतीच 4 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेला हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

सईद हा जागतिक दहशतवादी असल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघानेही दहा वर्षांपूर्वीच सईद याचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. सईद याला गेल्या सुमारे वर्षभर (2017) पाकिस्तानमध्ये नजरकैदेतही ठेवण्यात आले होते. दहशतवादावर कारवाई करावी, यासाठी पाकिस्तानवर सध्या जागतिक पातळीवरुन दबाव येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सईद याच्या संघटनेस राजकीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Hafiz Saeed political party