
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पतंग उडविण्यास कायदेशीररित्या बंदी घालण्यात आली आहे. पंजाब विधानसभेत यासंदर्भात विधेयक मंजूर झाले असून त्यात पतंग उडविताना आढळून आल्यास तीन ते पाच वर्षाची कैद किंवा वीस लाख पाकिस्तानी रुपये दंड भरण्याची शिक्षेची तरतूद केली आहे.