घटस्फोटादिवशीच 49 वर्षाच्या खासदारानं केलं तिसरं लग्न

Aamir Liaquat Hussain
Aamir Liaquat Hussainesakal
Updated on
Summary

'माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो सगळं ठिक करेल.'

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे पीटीआय खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन (Dr. Aamir Liaquat Hussain) यांनी 18 वर्षांच्या मुलीसोबत तिसरं लग्न केलंय. 49 वर्षीय हुसैन यांनी बुधवारी 18 वर्षीय सईदा दानिया (Saida Dania Shah) शाहसोबत लग्न केलं. खासदाराच्या या लग्नाची शेजारील राष्ट्रात जोरदार चर्चा सुरुय. विशेष म्हणजे, ज्या दिवशी आमिरचं लग्न झालं, त्याच दिवशी पाकिस्तानी खासदारानं आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला.

डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या नव्या पत्नीबद्दल लिहिलंय, काल रात्री 18 वर्षांच्या सईदा दानिया शाहासोबत माझं लग्न झालं. पाकिस्तानच्या या खासदारानं तिसऱ्या पत्नीचं तोंडभरुन कौतुक केलंय. 'सईदा खूप गोड, सुंदर, साधी आणि प्रिय आहे. मी माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी. आयुष्यातील वाईट काळ मी मागं सोडलाय. तो चुकीचा निर्णय होता, असं हुसैन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलंय.

Aamir Liaquat Hussain
पती असावं तर असा! मुन्ना भाईने दाबले पत्नीचे पाय; पाहा सुंदर VIDEO

काय म्हणाली, आमिर लियाकत हुसैनची दुसरी पत्नी?

खासदाराची दुसरी पत्नी अभिनेत्री तुबा आमिरनं (Actress Tuba Aamir) बुधवारी स्पष्ट केलं की, तिनं हुसैनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय. इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर करत तुबानं खुलासा केलाय की, आम्ही दोघं 14 महिन्यांपूर्वीच वेगळं झालो आहोत. आता आमच्यात समेट होण्याची कोणतीही आशा नाही. त्यामुळंच मी न्यायालयात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो सगळं ठिक करेल, असंही त्यांनी म्हंटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com