पाकिस्तानची स्थिती चिंताजनक ! तेल आयात करणे झाले कठीण, बँका कर्ज देईनात

पाकिस्तानची स्थिती चिंताजनक !
oil
oilsakal
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानची श्रीलंकेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे म्हणणं घाईचे ठरेल. मात्र हा शेजारील देश अशा काही संकटांशी सामना करत आहे, की उद्योगाला कच्चामाल आणि तेल (Oil) उत्पादने आयात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्ज उभारण्यात पळापळ होत आहे. डाॅन वृत्तपत्राने आपल्या सूत्रांचा हवाला देत सांगितले, की पेट्रोलियम खात्याने पंतप्रधान शाहाबाज शरीफ आणि अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांना सूचना केली आहे, की तेल आयात करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. (Pakistan In Trouble, Difficult To Import Oil And Banks Not Give Loan)

oil
...तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, इम्तियाज जलील यांनी दिले संकेत

कारण पेट्रोलियम कंपन्या आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पाद्वारा स्थानिक बँकांबरोबर उघडलेल्या एलसीवर विदेशी बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दैनिकाला सांगितले, की पाकिस्तान (Pakistan) स्टेट ऑईल (पीएसओ) आणि पाक-अरब रिफायनरी लिमिटेडला सोडून अन्य सर्व तेल विपणन कंपन्या आणि रिफायनरी पेट्रोलियम उत्पादने तथा कच्च्या तेलाच्या आयातीसाठी वेगवेगळ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

oil
पाकिस्तान : गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या, ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात जाणार?

वृत्तपत्रानुसार संबंधित मंत्रालयांच्या वतीने आर्थिक स्थिती आणि विदेशी मुद्रा विनिमयाविषयी दिलेल्या माहितीमुळे ५-७.५ कोटी डाॅलरचे सहा ते सात कार्गो थांबले आहेत. सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानी बँक तेल उद्योगाच्या वतीने एलसी उघडत आहे. मात्र त्यांचे सहकारी बँका कर्ज देईनात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com