

PIA Privatization
esakal
PIA Privatization : पाकिस्तानने मंगळवारी त्यांच्या राष्ट्रीय ध्वजवाहक एयरलाइनच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. ती स्थानिक गुंतवणूक कंपनीच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियम १३५ अब्ज रुपयांना विकली गेली.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) खासगीकरणासाठी बोली इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आली होती. जिथे लकी सिमेंट, खासगी एअरलाइन एअरब्लू आणि गुंतवणूक फर्म आरिफ हबीब यांच्यासह तीन कंपन्यांनी त्यांच्या सीलबंद बोली एका पारदर्शक बॉक्समध्ये टाकल्या होत्या.
त्यानंतर जेव्हा बोली उघडण्यात आल्या, त्यामध्ये आरिफ हबीबने ११५ अब्ज रुपयांची सर्वोच्च बोली लावल्याचे आढळून आले. लकी सिमेंटने १०५.५ अब्ज रुपयांची आणि एअरब्लूने २६.५ अब्ज रुपयांची बोली सादर केली होती.
बोली उघडल्यानंतर, सरकारने संदर्भ किंमत १०० अब्ज रुपयांची जाहीर केली. नियमांनुसार, दोन सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना सुरुवातीच्या लिलाव प्रक्रियेत स्पर्धा करण्याची संधी देण्यात आली. आरिफ हबीब आणि लकी सिमेंट या दोघांनीही एअरलाइन खरेदी करण्यासाठी जोरदार स्पर्धा केली आणि हळूहळू त्यांच्या बोली वाढवल्या. अखेर आरिफ हबीब ग्रुपने १३५ अब्जची बोली लावली जी सर्वाधिक ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.