esakal | बायडेन यांच्या एका फोन कॉलसाठी पाकिस्तानची धडपड, मध्यस्थाची घेतली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden

बायडेन यांच्या एका फोन कॉलसाठी पाकिस्तानची धडपड, मध्यस्थाची घेतली मदत

sakal_logo
By
दीनानाथ परब

लाहोर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (american president jo biden) यांनी यावर्षाच्या सुरुवातीला पदभार स्वीकारला. पण अजूनपर्यंत त्यांची एकदाही पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. इम्रान खान या मुद्यावर मीडीयासोबतही बोलले आहेत. आता अमेरिकेत असलेल्या एका प्रभावशाली पाकिस्तानी वंशाच्या (pakistan origin) व्यक्तीच्या माध्यमातून बायडेन आणि इम्रान खान यांच्यात फोन कॉलवरुन चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एक्प्रेस ट्रिब्युनने हा दावा केला आहे.

पाकिस्तान आता अनौपचारिकरित्या बायडेन यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी एका प्रभावशाली पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकासोबत संपर्क साधण्यात आला आहे. ही व्यक्ती बायडेन यांची मित्र आहे. बायडेन यांचे मित्र असल्यामुळे ही व्यक्ती इमरान-बायडेन यांच्यात संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

हेही वाचा: हत्ती कसे किस करत असतील? हा प्रश्न पडला असेल तर Video पहा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत संवाद साधतात. पण बायडेन यांनी ही परंपरा मोडली आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेत जाऊन बायडेन यांना भेटून आले. पण इम्रान यांच्यासोबत साधी फोन कॉलवरुन चर्चा झालेली नाही. बायडेन यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर जाहीर टीका करायचे. पण त्यांनी इम्रान खान यांच्यासोबत संवाद ठेवला होता.

हेही वाचा: आईच्या मित्राकडून विश्वासघात, १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

व्हाइट हाऊसकडून या मुद्यावर काही विशेष स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण पाकिस्तान आता अमेरिकेची पहिली प्राथमिकता उरलेली नाही, असे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

loading image
go to top