
पाकिस्तानातील लाहोर शहरात आज सकाळी तीन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमुळे लाहोरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून विमानतळ बंद करण्यात आले आहे.स्फोट होताच नागरिकांची पळापळ सुरु झाली. लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वॉल्टन रोडवर ड्रोन हल्ल्यानंतर लाहोरमध्ये प्रचंड गोंधळ उडाला असून लोक घाबरून रस्त्यावर उतरले.