Islamabad Express Accident : पाकिस्तानमधील लाहोरजवळ शुक्रवारी सायंकाळी इस्लामाबाद एक्सप्रेसला भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या गाडीचे सुमारे १० डबे रुळावरून घसरले असून, सुमारे ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.