'त्याने' धरण बांधण्यासाठी दिला तब्बल 8 कोटींचा निधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

शाहिद यांच्या निर्णयानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांची मानसिक स्थिती तपासण्याचे आदेश दिले. न्यायालयानेही त्यांच्या दान केलेल्या रकमेवर रोख लावली आहे. 

कराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे कुटुंबीय न्यायालयात गेल्याने त्यांची मानसिक चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट नष्ट करणे सर्वांत मोठे आव्हान आहे. धरणे उभारण्यासाठी परदेशात राहत असलेल्या नागरिकांना निधी देण्याचे आवाहन पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. इम्रान खान यांनी एक हजार डॉलर देण्याची विनंती पाकिस्तानी नागरिकांना केली आहे. मात्र, शाहिद शेख या व्यक्तीने तब्बल 8 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला. 

शाहिद यांच्या निर्णयानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांची मानसिक स्थिती तपासण्याचे आदेश दिले. न्यायालयानेही त्यांच्या दान केलेल्या रकमेवर रोख लावली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Man Donates Property Worth Rs 80 Million to Dam Fund Court Orders His Medical Check-up