Pakistan : धक्कादायक! कबरीत घुसून 48 मृत महिलांवर बलात्कार; तरुणांचं घृणास्पद कृत्य

पाकिस्तानमधून (Pakistan) धक्कादायक घटना समोर आलीये.
Pakistan Crime News
Pakistan Crime Newsesakal
Summary

मी आणि माझा मित्र वझिरा दोघं आळीपाळीनं बलात्कार करायचो.

पाकिस्तानमधून (Pakistan) धक्कादायक घटना समोर आलीये. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये पत्रकार एका मुलाला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. मुलाला त्याचं नाव आणि वय विचारत आहे. मोहम्मद रियाज (27) यानं कबरीत दफन केलेल्या 48 मुलींवर बलात्कार केलाय.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सरगोधा येथील रहिवासी असलेला रियाज कामाच्या शोधात आपल्या गावाहून कराचीला आला होता. इथं त्याला स्मशानभूमीत नोकरी मिळाली. सुमारे 16-17 वर्षांपासून इथं तो काम करत असल्याचं त्यानं पत्रकाराला सांगितलं.

इथं त्याचा एक मित्र वझिराही होता. जेव्हा एखाद्या महिलेचा मृतदेह स्मशानात यायचा, तेव्हा हे दोघं त्यावर लक्ष ठेवायचे. कबरीत दफन केल्यानंतर दोघंही मृतदेह बाहेर काढायचे आणि बलात्कार करायचे.

Pakistan Crime News
BBC IT Survey: PM मोदींवर डॉक्यूमेंट्री करणाऱ्या BBC कार्यालयावर Income Tax चा छापा; अमेरिका म्हणते, आता आम्ही..

रियाजनं सांगितलं की, मी आणि माझा मित्र वझिरा दोघं आळीपाळीनं बलात्कार करायचो. कबर पायाच्या बाजूनं आम्ही खोदायचो. माणसाला आरामात आत प्रवेश करता येईल, एवढी जागा त्यात तयार करण्यात आली होती.

त्यानंतर कबरीत घुसून मृतदेहावर बलात्कार करायचो. कोणालाही संशय येऊ नये म्हणून कबर पुन्हा पूर्वीप्रमाणंच झाकून घ्यायचो. आम्ही दोघांनी आतापर्यंत 48 मृत मुलींवर बलात्कार केला आहे.

Pakistan Crime News
मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला; कोणी केली होती चोरी?

जेव्हा मी शेवटच्या वेळी मृतदेहावर बलात्कार करण्यासाठी गेलो, तेव्हा मृतदेहात दात दिसू लागले. डोळ्यात विचित्र प्रकाश दिसत होता.

मी घाबरलो आणि कबरीतून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर अल्लाहकडं याचना करु लागलो. अल्लाहची माफी मागायला सुरुवात केली आणि पुन्हा कधीही हे घृणास्पद कृत्य न करण्याची शपथ घेतली, असं रियाजनं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com