'महिलांची कमी कपडे अन् चुकीच्या कामामुळेच कोरोना'

वृत्तसंस्था
Monday, 27 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना नेमका कशामुळे होतो, हे सुद्धा समजत नसतानाच एका मौलानीने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना नेमका कशामुळे होतो, हे सुद्धा समजत नसतानाच एका मौलानीने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान उपस्थित होते.

प्रेमाची ताकद पाहा; डोळ्यात येतील अश्रू...

पाकिस्तानमधील प्रसिद्ध कट्टरपंथी मौलाना तारिक जमील म्हणाले, 'महिला लहान आणि तोकडे कपडे घालतात. शिवाय, त्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे जगाला ही शिक्षा भोगावी लागली आहे आणि करोना विषाणू हादेखील त्याचाच परिणाम आहे. मी, केलेल्या वक्तव्यानंतर काही प्रसारमाध्यमे मी माफी मागितल्याची खोटे वृत्त दाखवत आहेत. पण, मी जे काही बोललो त्यासाठी माफी मागणार नाही.'

अबब! पाकिस्तानमध्ये 60 वर्षाचा वृद्ध राहिला गरोदर...

दरम्यान, जमील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जगभरातून टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानमधील मानवाधिकार आयोगानेही टीका केली असून, माफी मागण्यास सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan maulana tariq jameel blame womens for coronavirus crisis