हिंदू हे गायीचे मूत्र पिणारेः पाक मंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 मार्च 2019

लाहोरः हिंदू हे गायीचे मूत्र पिणारे असून, भारत हा पाकिस्तानची बरोबरी करू शकत नाही, असे तारे पाकिस्तानचे सांस्कृतीकमंत्री फैयाज अल हसन चौहान यांनी तोडले आहेत. नेटिझन्सनी चौहान यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

लाहोरमध्ये 24 फेब्रुवारी मध्ये एका कार्यक्रमादरम्यान चौहान यांची जीभ घसरली. हिंदू हे गायीचे मूत्र पिणारे असून, भारत हा पाकिस्तानची बरोबरी करू शकत नाही, असे चौहान म्हणाले. परंतु, चौहान यांच्या वक्तव्याची क्लिप सोमवारी (ता. 4) व्हायरल झाली. यानंतर नेटिझन्सनी चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. ट्वीटरवर काही वेळातच #SackFayazChohan व #Hindus असा ट्रेण्ड आला.

पाकिस्तानचे नईमुल हक यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, 'हिंदू नागरिकांविरोधात पंजाबचे मंत्री फैयाज चौहान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. मुख्यमंत्र्याशी चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.'

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल ट्विटरवर म्हणाले, पाकिस्तानी झेंड्यावर ज्याप्रमाणे हिरवा रंग आहे, त्याचप्रमाणे पांढरा रंग सुद्धा आहे. पांढरा रंग हा हिंदू नागरिकांच्या योगदानाचे सन्मान करत असून, तो आपला समजला जातो.'

पाकिस्तानचे पतंप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळामध्ये चौहान हे सांस्कृतीकमंत्री म्हणून काम पहात आहेत. शिवाय, पंजाबचे ते मंत्री आहेत. पाकिस्तानमधील विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी चौहान यांच्यावर जोरदार टीका करत कारवाईची मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Minister criticised for anti Hindu remarks, Pak government slams him