पाकमधील आमदारच म्हणतोय, ‘इथे मुस्लिमही सुरक्षित नाहीत, मोदीसाहेब लक्ष द्या’

टीम ई-सकाळ
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शिख समाज अडचणीत आहे. अर्थात हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे आमदारांनी सांगितले आहे. पीटीआयचे आमदार बलदेव कुमार सध्या भारतात आले असून, त्यांनी भारताकडे आश्रय मागितला आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात सामाजिक परिस्थितीही खूप बिघडली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शिख समाज अडचणीत आहे. अर्थात हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे आमदारांनी सांगितले आहे. पीटीआयचे आमदार बलदेव कुमार सध्या भारतात आले असून, त्यांनी भारताकडे आश्रय मागितला आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानातील २३ जणांना दिला भारताने आश्रय

हिंदू, शिखांची अवस्था वाईट
पाकिस्तानात खैबर पख्तून ख्वा प्रांतातील बारिकोटमध्ये बलदेव कुमार सहकुटुंब भारतात आले असून, त्यांनी पुन्हा पाकिस्तानात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजाची अवस्था खूपच वाईट आहे. त्याच्यावर खोटे खटले चालवले जात आहेत. बलदेव कुमार यांच्यावर २०१६मध्ये आमदाराच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुढं २०१८मध्ये त्यांना या प्रकरणात निर्दोष सोडून देण्यात आलं. बलदेव म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाबद्दल हाच विषय नाही तर, या समाजातील मुलींचे सक्तीने मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात येत आहे. त्यांचा जबरदस्तीने मुस्लिम तरुणांशी विवाह केला जात आहे.

अल्पसंख्याक समाजाची अवस्था वाईट
पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी नानकाना साहीब गुरुद्वाराच्या ग्रंथींची कन्या जगजीत कौर हिचा एका मुस्लिम तरुणाशी विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर तिचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले. हा विषय खूप गाजला असून, इतरांनी हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित मुलीला तिच्या घरी परत सोडण्यात आले आहे. भारतात अल्पसंख्याक समाजाला वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानातच अल्पसंख्याक समाजाची अवस्था खूप वाईट आहे, असे बलदेव कुमार यांनी सांगितले.

आणखी वाचा : Video पाकिस्तानातही उडाले रॉकेट; पाहा भन्नाट व्हिडिओ

‘तेथे मुस्लिमही सुरक्षित नाहीत’
बलदेव कुमार म्हणाले, ‘भारत सरकारने पाकिस्तानातील हिंदू आणि शिखांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. जेणेकरून ती कुटुंबे भारतात येतील. त्यांच्यावर पाकिस्तानात खूप अत्याचार केले जात आहेत. मोदी साहेबांनी त्यांच्यासाठी काही तरी करावे. पाकिस्तान अल्पसंख्याकच नव्हे तर, मुस्लिमही सुरक्षित नाहीत. अतिशय खडतर परिस्थितीत आम्ही पाकिस्तानात जगत होतो. माझी भारत सरकारला विनंती आहे की, त्यांनी मला येथे राजकीय आश्रय द्यावा. मी पुन्हा पाकिस्तानला जाणार नाही.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan mla baldev kumar seeks political asylum from india pm narendra modi