
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचे पुनरावलोकन केले जाणार आहे. पाकिस्तानच्या संसदेतील कायदा आणि न्याय संबंधित स्थायी समितीने यासंबंधी एक विधेयक मंजूर केले आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणीही सुरु आहे.
Pakistan National Assembly’s Standing Committee on Law and Justice has approved a bill that seeks a review of the conviction of Indian national Kulbhushan Jadhav, who has been sentenced to death by a military court. (File photo) pic.twitter.com/iWFOksHIxo
— ANI (@ANI) October 22, 2020
'आंतरराष्ट्रीय न्यायालय (समीक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश' शीर्षक असलेले विधेयक राष्ट्रीय संसदेच्या विधी आणि न्याय संबंधित स्थायी समितीने विरोधकांच्या तीव्र विरोधानंतरही बुधवारी चर्चा करत याला मंजुरी दिली. समितीच्या चर्चेत सहभागी झालेले पाकिस्तानचे कायदा मंत्री फरोग नसीम यांनी हा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आल्याचे सांगितले. जर पाकिस्तानच्या संसदेने याला मंजुरी दिली नाही तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले नाही म्हणून निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा फरोग नसीम यांनी दिला.
हेही वाचा- ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान व्हॉलेंटिअरचा मृत्यू
भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना हेरगिरीचा आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. पाकिस्तानमधील एका लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आणि जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्क साधू न दिल्याबद्दल 2017 मध्येच आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै 2019 मध्ये पाकिस्तानला जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा करण्यास सांगितले होते.