'पाकिस्तानच्या सागरी सीमेत भारताने घुसवली पाणबुडी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 मार्च 2019

भारताच्या बालाकोटमधल्या हवाई हल्ल्याला आठवडा पूर्ण झालेला असतानाच पाकिस्तानने आणखी एक दावा केलाय. 4 मार्चला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत भारतीय पाणबुडी दिसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्याबाबतचं अधिकृत वृत्त 'डॉन' या पाकिस्तानी माध्यमाच्या संकेतस्थळावरून देण्यात आले आहे.

नवी दिल्ली- भारताच्या बालाकोटमधल्या हवाई हल्ल्याला आठवडा पूर्ण झालेला असतानाच पाकिस्तानने आणखी एक दावा केलाय. 4 मार्चला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत भारतीय पाणबुडी दिसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्याबाबतचं अधिकृत वृत्त 'डॉन' या पाकिस्तानी माध्यमाच्या संकेतस्थळावरून देण्यात आले आहे.

'डॉन'ने हे वृत्त पाकिस्तानी नौदलाच्या हवाल्याने दिलं आहे. पाकिस्तानी नौदलाकडून एक व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात एका पाणबुडीचा वरचा भाग दिसतो आहे. या प्रकरणावर भारतीय नौदलानेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या व्हिडीओचा तपास करत असल्याचे नौदलाने म्हटले आहे.

यापूर्वी नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी पत्रकार परिषद घेऊन दहशतवादी समुद्र मार्गाने हल्ल्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली होती. समुद्री मार्गाने हल्ल्याचं प्रशिक्षण दहशतवाद्यांना देण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan navy detected an indian submarine entered in pakistani waters claims the dawn