इम्रान खान यांची गच्छंती अटळ?; नवाज शरीफांच्या पक्षाकडून PM उमेदवार घोषित

इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल.
imran khan
imran khanSakal

इस्लामाबाद : पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांची गच्छंती अटळ असल्याचे जवळपास निश्चित मानल जात असून, नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने (PML-N) पंतप्रधानपदासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्ष PML-N ने नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केले आहे. या घोषणेनंतर विद्यमान पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याबाबतच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. (Nawaz Sharif Party Announced PM Candidate Name)

imran khan
सोलापुरमधील चाटी गल्लीत गॅसचा स्फोट; दहा वाड्यांना भीषण आग

नवाझ शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम नवाज (Maryam Nawaz) म्हणाल्या की, पक्षाने शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान यांच्याविरोधात आणण्यात येत असलेला अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल, अशी आशादेखील मरियम यांनी व्यक्त केली आहे.

imran khan
दिल्लीत 'आप' ला झटका; तिन्ही महापालिकांचे होणार विलीनीकरण, केंद्राची खेळी

अविश्वास प्रस्ताव 25 मार्चला

इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (Motion Of No Confidence) चर्चा करण्यासाठी 25 मार्च रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नॅशनल असेंब्लीची बैठक बोलावली आहे. अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणातील गैरव्यवस्थापनासाठी विरोधी पक्षनेत्यांकडून खान यांना जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे 2018 मध्ये सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांच्यासाठी अविश्वास प्रस्ताव ही सर्वात कठीण परीक्षा मानली जात आहे, कारण त्यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांनीही त्यांच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या कायद्यानुसार एखाद्या खासदाराने आपल्याच पक्षाच्या सरकारच्या विरोधात मतदान केले तर त्याची सत्ता जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com