हाफिज सईदच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रयत्न

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

पाकिस्तान सरकारने काढला गोपनीय आदेश

इस्लामाबाद: लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईदशी संबंधित मालमत्ता आणि त्याने स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा विचार असल्याचे वृत्त "रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सईदशी संबंधित संस्था आणि मालमत्ता जप्त करण्याचे पाकिस्तान सरकारचे नियोजन असून, त्यासाठी एक गोपनीय आदेश काढण्यात आल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.

सईदशी संबंधित असलेल्या जमात उद दवा (जेयूडी) आणि फला ए इन्सानियत फाउंडेश (एफआयएफ) या दोन संस्था ताब्यात घेण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारने दिले असून, त्यासाठी पाकिस्तानातील पाचही प्रांतांच्या सरकारांनी 28 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या सरकारी गोपनीय आदेशाची प्रत वृत्तसंस्थेला प्राप्त झाली असून, ती 19 डिसेंबर रोजी जारी करण्यात आली असल्याचे समजते.

"लष्करे तैयबा'शी संबंधित असलेली "एफआयएफ' आणि "जेयूडी' या दोन्हींवर अमेरिकेने बंदी घातली असून, सईदचे नावही आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या सईदवर कारवाई करावी, अशी मागणी भारताकडून वारंवार करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan news Attempts to take possession of Hafiz Saeed's property