esakal | पाकिस्तानमध्ये हिंदूना रेशन देण्यास नकार
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानमध्ये हिंदूना रेशन देण्यास नकार

पाकिस्तानमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 1500च्या पुढे गेली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक प्रभावित प्रांतांमध्ये पंजाब आणि सिंधचा समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदूना रेशन देण्यास नकार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्‍लामाबाद : पाकिस्तानमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. पाकिस्तानमधील कराची शहरात हिंदू नागरिकांना रेशन देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.

पाकिस्तानमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार लोकांना फुकटात रेशन देत आहेत. मात्र येथील हिंदूना रेशन मिळेनासे झाले आहे. ही घटना सिंध प्रांतातील कराची शहरात घडली आहे. सिंध प्रांतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील मुस्लिमांना रेशन व आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत पण हिंदूंना मात्र देण्यास नकार दिला जात आहे.

हिंदूंना सांगण्यात आले आहे की, हे रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकमधील लॉकडाऊन लक्षात घेता दररोज कामगार आणि कामगारांना स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या वतीने रेशन देण्याचे आदेश सिंध सरकारने दिले आहेत. एवढेच नव्हे तर एकाचवेळा तब्बल 3 हजार लोकं रेशन घेण्यासाठी जमतात, यासाठी कोणतेही व्यवस्था केलेली नाही. एवढेच नाही तर लियारी, सचल घोथ, कराचीच्या इतर भागांसह संपूर्ण सिंधमध्ये हिंदूंना रेशन नाकारले जात आहे. 