शर्म करो, शर्म करो, इम्रान खान शर्म करो...

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

इस्लामाबादः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्याचे पडसाद पाकिस्तानमधील संसदेत आज (मंगळवार) उमटले. संसदेचे कामकाज सुरू होताच शर्म करो, शर्म करो, इम्रान खान शर्म करो... असे नारे विरोधकांनी लगावले.

संसेदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले, भारताने सीमेचे उल्लंघन करताना आपल्या हद्दीत येऊन हल्ला केला आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा हक्क आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष शेरी रहमान म्हणाले, 'भारताने चुकीच्या पद्धतीने घुसखोरी करून हल्ला केला आहे. भारताचे हे चुकीचे पाऊल आहे. यामुळे शांततेऐवजी अशांतता निर्माण होईल. भारतातील सत्ताधारी पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी युद्धाच्या दिशेने पाऊल टाकत आहे.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan parliament reaction over surgical strike