विमानाच्या ढिगाऱयाखाली सापडले कोट्यवधी रुपये...

वृत्तसंस्था
Friday, 29 May 2020

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विमानाच्या ढिगाऱयाखाली कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली असून, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहेत.

इस्लामाबाद: पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विमानाच्या ढिगाऱयाखाली कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली असून, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहेत.

Video: टोळधाडीवर शेतकऱयाने लढवली शक्कल...

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान लाहोरवरून कराचीकडे निघाले होते. मात्र, उड्डानानंतर काही वेळातच विमानाला  शुक्रवारी (ता. 22) अपघात झाला होता. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळले. यावेळी झालेल्या अपघातात 97 जणांचा मृत्यू झाला होता, दोन जण बचावले होते. अपघातानंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह बाहेर काढताना विमानाच्या ढिगाऱ्यात तब्बल तीन कोटी रुपयांची सापडली. या रक्कमेमध्ये विविध देशांच्या चलनी नोटा आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

...अन् 'त्या' व्हिडिओमुळे सापडले वडील!

दरम्यान, विमानाच्या ढिगाऱयाखाली एवढी मोठी रक्कम आढळल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 47 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून 43 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan plane crash three crore recovered pia crash plane